शपथ तुला प्रेमा, नको त्या मंदिरात जाऊ
यौवनमंदिर नाम तयाचे
मायावी हे कसब मयाचे
लोभस कपटी शोभा इथली चुकुन नको पाहू
दिसते तैसे येथे नाही
आसन दिसते तेथे खाई
अपघाती या सोपानावर पाय नको ठेवू
या, या म्हणती जरी युवराजे
हसूच करतिल तुझे न् माझे
बाळपणाच्या झोपडीत ये जन्मभरी राहू
यौवनमंदिर नाम तयाचे
मायावी हे कसब मयाचे
लोभस कपटी शोभा इथली चुकुन नको पाहू
दिसते तैसे येथे नाही
आसन दिसते तेथे खाई
अपघाती या सोपानावर पाय नको ठेवू
या, या म्हणती जरी युवराजे
हसूच करतिल तुझे न् माझे
बाळपणाच्या झोपडीत ये जन्मभरी राहू
No comments:
Post a Comment