शालू हिरवा पाच नि,Shalu Hirava Paach Ni

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा !
गोऱ्या भाळी चढवा जाळी नवरत्‍नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा !

चूलबोळकी इवली इवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जीव हा झाला

सूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारी
वाजत गाजत मिरवत येईल घोड्यावरुनी स्वारी
मी वरमाला घालिन त्याला मुहूर्त जवळी आला

मंगल वेळी मंगल काळी डोळा का ग पाणी ?
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधिन त्याचा शेला

No comments:

Post a Comment