शब्द शब्द जुळवुनी,Shabd Shabd Julavuni

शब्द शब्द जुळवुनी वाचीते तुझ्या मना
आवरु किती गडे धीर नाही लोचना

अजाणतेपणी कुणी मला कुणास वाहिले
असेल देव तो तरी मी न त्यास पाहिले
आंधळी कळी खुळी मजसि काय कल्पना

उघडताच पाकळी लाभली तुझी दिठी
तुजसि देव मानुनी घातली गडे मिठी
नितीपाठ ओरडे हीच पापवासना

पाप-पुण्य ना कळे उरे उरात आस रे
हेच पाय पूजिणे असा जीवास ध्यास रे
देव तू उभा सजीव घ्यावयास पूजना

1 comment:

  1. superb melody indeed..but the third stanza is not available in the song on you tube

    ReplyDelete