सजवू या हा संसार,Sajavu Ya Sansar

सजवू या हा संसार आपुला, या हो तुम्ही पतीदेव या
हे घर जणु सागर, तुम्ही विष्णू, मी लक्षुमी पाय चरावया

अणा लागला आज पासुनी रोज रोज तुमच्या मागे
संसाराची उतरंड रचू, एकच दोघे होऊया

दुसरे आणा, हे घ्या तिसरे, एकावरती एक रचू
प्रेम आपुले माणिकमोती, यात भरुनी ठेवूया

कोंड्याचा मी करीन मांडा, तुला राजसा काय कमी
घर जणु सागर, तुम्ही विष्णू, मी लक्षुमी पाय चरावया

No comments:

Post a Comment