लाल शालजोडी जरतारी,Lal Shaljodi Jartari

लाल शालजोडी जरतारी झोकदार शिरिं बांधोनी ।
नाचत चाले जैसा येतों रंगभूमिवर नट सजुनी ।
वाजे कडकड छाटि गुलाबी माळ जपाची करिं धरुनी ।
ध्यान धरुनि बैसतां दिसे मज दांभिकपण वर ये फुटुनी ।
सर्वांगावर भस्माचे ते पुंड्र लावि किति रेखोनी ।
त्यावरि रुद्राक्षांच्या माळा घालितसे तरि किती जपुनी ।
स्फटिकांची ती सुबक कुंडले डुलतांना हलती कानीं ।
पायिं खडावा चटचट करिती दंड शोभती करिं तीन्ही ॥

No comments:

Post a Comment