लाख तारका चमचम,Lakh Taraka Cham

लाख तारका चमचम करती
आभाळाच्या निळ्या अंगणी
चिमण्या बाळा मिट पापणी

झोपी गेला घरट्यामधुनी
चिव्चिवणारी रानपाखरं
शांत चराचर जग पेंगुळले
जो जो बाळा गाते रजनी

गाल गोबरे वदन हासरे
ओठ गुलाबी इवले इवले
कुरळे कुरळे केस कपाळी
काजळ काळे भरले नयनी

No comments:

Post a Comment