गुंजते सर्वांग माझे गोड उठती झंकृती
रंगवि रे चित्रकारा हीच माझी आकृती
काजळावाचून डोळे आज दिसती देखणे
गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे
अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्वीकृती
हीच माझी आकृती !
दाटला रे हर्ष ओठी हळूच वळते हनुवटी
रोमरोमी या शरिरी लाजरीची रोपटी
उमज माझी मज पडेना स्वप्न कि ही जागृती
हीच माझी आकृती !
अंगलटीची ऐट झाली आज का ही वेगळी
मधुप पुढती थांबलेला फूल लपवी पाकळी
अधीरले मी मीलनासी परि न करवे ती कृती
हीच माझी आकृती !
रंगवि रे चित्रकारा हीच माझी आकृती
काजळावाचून डोळे आज दिसती देखणे
गोरट्या या अंगरंगा न्हाऊ घाली चांदणे
अर्पणाच्या ओंजळीला आज लाभे स्वीकृती
हीच माझी आकृती !
दाटला रे हर्ष ओठी हळूच वळते हनुवटी
रोमरोमी या शरिरी लाजरीची रोपटी
उमज माझी मज पडेना स्वप्न कि ही जागृती
हीच माझी आकृती !
अंगलटीची ऐट झाली आज का ही वेगळी
मधुप पुढती थांबलेला फूल लपवी पाकळी
अधीरले मी मीलनासी परि न करवे ती कृती
हीच माझी आकृती !
No comments:
Post a Comment