रानारानात गेलि बाइ शीळ
राया, तुला रे, काळयेळ नाही
राया, तुला रे, ताळमेळ नाही
थोर राया, तुझं रे कुळशीळ
वाहे झरा ग, झुळझुळवाणी
तिथं वाऱ्याचि गोड गोड गाणी
तिथं राया तु उभा असशील
तिथं रायाचे पिकले मळे,
वरी आकाश शोभे निळे
शरदाच्या ढगाचि त्याला झील
येड्यावानी फिरे रानोवना
जसा काही ग, मोहन कान्हा
हासे जसा ग, राम घननीळ
गेले धावून सोडुन सुगी
दुर राहून राहिली उगी
शोभे कसा ग गालीचा तो तीळ
रानि राया ग हा फुलावाणी
फुला फुलात मी फुलराणी
बाइ, सुवास रानि भरतील
फिरु गळ्यात घालुनि गळा,
मग घुमव मोहन शिळा,
रानि कोकीळ सुर धरतील !
राया, तुला रे, काळयेळ नाही
राया, तुला रे, ताळमेळ नाही
थोर राया, तुझं रे कुळशीळ
वाहे झरा ग, झुळझुळवाणी
तिथं वाऱ्याचि गोड गोड गाणी
तिथं राया तु उभा असशील
तिथं रायाचे पिकले मळे,
वरी आकाश शोभे निळे
शरदाच्या ढगाचि त्याला झील
येड्यावानी फिरे रानोवना
जसा काही ग, मोहन कान्हा
हासे जसा ग, राम घननीळ
गेले धावून सोडुन सुगी
दुर राहून राहिली उगी
शोभे कसा ग गालीचा तो तीळ
रानि राया ग हा फुलावाणी
फुला फुलात मी फुलराणी
बाइ, सुवास रानि भरतील
फिरु गळ्यात घालुनि गळा,
मग घुमव मोहन शिळा,
रानि कोकीळ सुर धरतील !
No comments:
Post a Comment