रामा हृदयी राम नाही
पतिव्रते चारुते, सीते, का रडसी धायी धायी ?
राहिलीस तू रावणसदनी, शंकित होता ती जनवाणी
त्यजिता तुजला याच कारणी, सर्वसाक्षी सर्वज्ञानी
राम तुझा तो उरला नाही
पावित्र्याला कलंक लावुन, पतितची झाला पतितपावन
करण्या पावन श्री रघुनंदन, पतिव्रते ग लाव पणाला
शतजन्मांची तव पुण्याई
लोकग्रणी त्या रामा हृदयी, जनतारूपी तूची सीता
तुला कलंकित तूच म्हणता, व्याकुळ झाला तव हृदयीचा
करुणाकर प्रभु रामचंद्रही

No comments:
Post a Comment