यशाला घालती माला,Yashala Ghalati Mala

यशाला घालती माला यशाचे सर्व देव्हारे
यशाची लागता किल्ली खुली होतात ही दारे

यशाच्या जाहिरातीला दलालांच्या खुल्या पेठा
नटीचे लाडके कुत्रे बने संताहुनी प्यारे

यशाचा खोकला सुद्धा विके गाण्यापरी येथे
यशाला हे गुणी सुद्धा असे लाचार सामोरे

यशाच्या आसनावरती जरासे बूड टेकावे
किती गर्दी, किती टाळ्या, किती हे स्तोत्र गाणारे

यशाची लागता किल्ली खुली होतात ही दारे

No comments:

Post a Comment