या विठूचा गजर हरिनामाचा,Ya Vithucha Gajar Hari

या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला ।
या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला ॥१॥

कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण ।
नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा ॥२॥ झेंडा रोविला ।

उखळण प्रेमाची काढिली, स्वस्थ बसुनी सद्‍गुरूजवळी ।
प्याला घेतला ज्ञानाचा, तोच अमृताचा ॥३॥ झेंडा रोविला ।

पचतत्वांची गोफण, क्रोध पाखरे जाण ।
धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण ।
केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा ॥४॥ झेंडा रोविला ।



3 comments:

  1. या अभंगातील रुपकांंचे निरुपण कोणी केलंय का?
    शाहिर साबळे यांच्या आवाजातील मूळ गाणं ऐकखयला मिळेल का?

    ReplyDelete