या वाऱ्याच्या बसुनी विमानी सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची
आज पौर्णिमा जमले तारे आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती अपुल्या मोठ्या मोदात
हसुनी चांदण्या करीती किलबील अपुल्या इवल्या डोळ्यांची
द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत
कधी वर्गातून पळते उल्का, ओढ लागुनी पृथ्वीची
कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे
रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ ताऱ्यांची
कधी वेळेवर केव्हा उशीरा, अवसेला तर पूर्ण रजा
राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा
असे मिळाया गुरुजी आम्हा करू प्रार्थना देवाची

No comments:
Post a Comment