या हृदयीचा तो राजेश्वर,Ya Hridayicha To Rajeshwar

लावण्याने लाजून जावे, मदनानेही मोहित व्हावे
रूप जयाचे असे मनोहर, या हृदयीचा तो राजेश्वर !

धर्मासंगे ज्याचे नाते, कर्म जयाचे चरण वंदिते
त्यात धनंजय जो लोकोत्तर, या हृदयीचा तो राजेश्वर !

कोटि चंद्र जणू नभी झळकती, अशी जयाची उज्वल प्रिती
कुरवंडावे प्राण जयावर, या हृदयीचा तो राजेश्वर !

धनुष्य ज्याने घेता हाती शत्रु चळचळा रणी कापती
सदैव विजयी वीर धनुर्धर, या हृदयीचा तो राजेश्वर !

No comments:

Post a Comment