या गो दांड्यावरना बोलते,Ya Go Dandyavarana Bolate

या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो

त्यांच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक
त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी साऱ्या
त्यांच्या डोईमंदी, सायलींच्या गो येन्या
पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन
त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत
त्यांचे वऱ्हाडी गो, वऱ्हाडी फेटेवाले
त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले
त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले
त्यांनी उरविले, उरविले दारुगोले

No comments:

Post a Comment