या बकुळीच्या झाडाखाली,Ya Bakulichya Jhadakhali

या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले
इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी झुला झुले

इथेच माझी बाळ पाऊले दंवात भिजली बालपणी
दूर देशीच्या युवराजाने इथेच मजला फूल दिले

तिने आसवे पुसली माझी, हृदयामधला गंध दिला
चांदण्यातले सोन कवडसे माझ्यासाठी अंथरले

बकुळी माझी सखी जीवाची जन्मांतरीचे प्रेम जुने
तिला पाहता खुलते मी अन्‌ मला पाहता तीही ही खुलेNo comments:

Post a Comment