रविवार माझ्या आवडीचा,Ravivar Majhya Aavadicha

एक नाही दोन नाही, बेरीज-वजाबाकी नाही
तीन नाही चार नाही, भुमितीची सजा नाही
दिवस उद्याचा सवडीचा, रविवार माझ्या आवडीचा

सोमवारी असतो गणिताचा तास
गणिताच्या तासाला मी नापास
गणित विषय माझ्या नावडीचा

भलताच कठीण तो मंगळवार
डोक्यावर असतो भूगोलाचा भार
भूगोल विषय माझ्या नावडीचा

घेऊन तोफा अन्‌ तलवारी
इतिहास येतो बुधवारी
इतिहास माझ्या नावडीचा

No comments:

Post a Comment