मना तुझे मनोगत,Mana Tujhe Monogat

मना तुझे मनोगत मला कधी कळेल का ?
तुझ्यापरी गूढ-सोपे होणे मला जुळेल का ?

कोण जाणे केवढा तू व्यापतोस आकाशाला
आकाशाचा अर्थ देशी एका मातीच्या कणाला
तुझे दार माझ्यासाठी थोडे तरी खुलेल का ?

कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्ष
तुझ्यामधे सामावला वारा, काळोख, प्रकाश
तुझे अरुपाचे रूप माझ्यापुढे फुलेल का ?

कशासाठी कासाविशी कशासाठी आटापिटी ?
खुळ्या ध्यास आभासांचा पाठलाग कोणासाठी ?
तुझ्या मनातले आर्त माझ्या मनी ढळेल का ?No comments:

Post a Comment