मल्मली तारुण्य माझे तू,Malmali Tarunya Majhe

मल्मली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे !
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे !

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे !

तापल्या माझ्या तनूची तार झंकारून जावी
रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे !

रे ! तुला बाहूत माझ्या रूपगंधा जाग यावी
मी तुला जागे करावे ! तू मला बिलगून जावे !



No comments:

Post a Comment