माळ-पदक विठ्ठल विसरला,Mal-Padak Vitthal Visarala

माळ-पदक विठ्ठल, विसरला भक्ताघरी
आला आळ जनीवरी केली पदकाची चोरी

चंद्रभागेच्या तीराला, सूळ तयांनी रोवीला
दंड-काढण्या लावील्या, जनी जाते सूळावरी

जनी म्हणे पांडुरंगा, वृथा आळ माझ्यावरी
नाही आम्ही जगी केली, तुझ्या पदकाची चोरी

तोच धावला संकटी, पांडुरंग जगजेठी
झाले पाणी सुळाचे ग, धन्य जनी, धन्य हरी

No comments:

Post a Comment