मजवरी माधव रुसला बाई,Majvari Madhav Rusala Bai

मजवरी माधव रुसला बाई, काही केल्या बोलत नाही

सोनपाऊले मी आसवांनी, न्हाऊ घातली करकमलांनी
पूजा बांधिली भावफुलांनी, उधळुनी मजला लोटुन देई

लगटुनि अंगा किती विनविले, बोल नाही तर मी पण रुसले
रुसता रुसता मधेच हसले हरि गोजिरा - हसला नाही

तव हृदयाची चोरी केली, राधेची का आगळीक झाली
अनंत हृदये तुवा चोरिली, राग कधी कुणी धरला नाही

No comments:

Post a Comment