माझ्या मायेच्या माहेरा,Majhya Mayechya Mahera

माझ्या मायेच्या माहेरा मला कधी नेसी ?
मायबाप विठ्ठला, रे, कधी भेट देसी ?

रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !

ज्ञानियांचा राजा तुझा बाळ लडिवाळ
अवघे वैष्णव तुझे लाडके गोपाळ
मला एकलीला का, रे, दूर मोकलीसी ?
मायबाप विठ्ठला, रे, कधी भेट देसी ? ?

तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा
रामकृष्ण हरी ! रामकृष्ण हरी !

टाळ मृदंगाची साथ, नामाचा सोहळा
भीवरेच्या तीरी नाचे धुंद संतमेळा
दुरावले कैशी, देवा, मीच दर्शनासी ?
मायबाप विठ्ठला, रे, कधी भेट देसी ?

No comments:

Post a Comment