मध्यरात्रिला पडे तिच्या दारावरती थाप
नवथर जीवाचा झाला भीतीने थरकाप
धडधडत्या वक्षावरती ठेउनि उजवा हात
कानोसा घेऊ लागे तशीच अंधारात
परिचित आली तोच तिच्या कानावरती शीळ
सांगे की या राधेचा दारि उभा घननीळ !
भीतीचा लवलेश नुरे त्या सुंदर नयनांत
भीतीवरती प्रीती ही अशीच करिते मात
माथ्यावरुनी सावरुनी पदर घेतला नीट
दार उघडुनी बाहेरी उभी ठाकली धीट
परिचित बाहूंचा पडला विळखा तो देहास
आणि मिळाले उभयांचे श्वासांमध्ये श्वास
अधीर ओठांची झाली क्षण थरथरती भेट
हृदयीचे गूज खोलवरी जावुनी भिडले थेट
आलिंगन ते शिथिल परी झाले दुज्या क्षणास
भवतीच्या जगताची हो जाणिव धुंद मनास !
अंधारातच गेला तो शूर तिचा सरदार
खिन्न मनाने परत फिरे ही चंद्राची कोर !
कळ दु:खाची तीव्र उठे तिच्या काळजातून
गालावरुनी ओघळली आणि आसवे ऊन
मंद समीरण भवताली गाई करुणा-गीत
अन्य कुणा नच कळली ती अंधारातली भेट !
नवथर जीवाचा झाला भीतीने थरकाप
धडधडत्या वक्षावरती ठेउनि उजवा हात
कानोसा घेऊ लागे तशीच अंधारात
परिचित आली तोच तिच्या कानावरती शीळ
सांगे की या राधेचा दारि उभा घननीळ !
भीतीचा लवलेश नुरे त्या सुंदर नयनांत
भीतीवरती प्रीती ही अशीच करिते मात
माथ्यावरुनी सावरुनी पदर घेतला नीट
दार उघडुनी बाहेरी उभी ठाकली धीट
परिचित बाहूंचा पडला विळखा तो देहास
आणि मिळाले उभयांचे श्वासांमध्ये श्वास
अधीर ओठांची झाली क्षण थरथरती भेट
हृदयीचे गूज खोलवरी जावुनी भिडले थेट
आलिंगन ते शिथिल परी झाले दुज्या क्षणास
भवतीच्या जगताची हो जाणिव धुंद मनास !
अंधारातच गेला तो शूर तिचा सरदार
खिन्न मनाने परत फिरे ही चंद्राची कोर !
कळ दु:खाची तीव्र उठे तिच्या काळजातून
गालावरुनी ओघळली आणि आसवे ऊन
मंद समीरण भवताली गाई करुणा-गीत
अन्य कुणा नच कळली ती अंधारातली भेट !
No comments:
Post a Comment