बे एके बे, बे दुणे चार,Be Eke Be, Be Dune

बे एके बे, बे दुणे चार
बे त्रिक सहा, बे चोक आठ
बे पंचे दहा, याचा दिमाख पहा
बे सख बारा, बघा खेळ कसा सारा

बे साती चौदा, असा कसा सौदा
बोलू नका जादा, पाढा नाही साधा
बे आठी सोळा, होऊ खुशाल गोळा
खेळ खेळू सारे चला चुकवुनी डोळा

बे नवे अठरा, गणिताची जत्रा
पाढा झाला पाठ, आता हाती आली मात्रा
बे दाही वीस, आता नको घासाघीस
पाढा सारा म्हणुनीया दावू गुरुजीस

No comments:

Post a Comment