प्रतिमा उरी धरोनी,Pratima Uri Dharoni

प्रतिमा उरी धरोनी मी प्रीतिगीत गावे

ते गीत प्रीतिचे रे हळूवार मी म्हणावे
अस्फूट भावनांच्या स्वप्नात गुंग व्हावे

पुष्पात गंध जैसा, गीतात भाव तैसा
अद्वैत प्रीतिचे हे मम जीवनी असावे

तू सप्तरंग धनुचे, स्वर सात बासरीचे
संगीत जीवनाचे, अळवीत मी बसावे

का रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे
हे भावस्वप्न अपुरे साकार तू करावेNo comments:

Post a Comment