गळला मोहर झडली पालवी
फळे लागली निळी जांभळी
पिकलं जांभूळ तोडू नका
माझ्या झाडावरती चढू नका
मला चोरांची भिती लई वाटते
भर झोपेत दचकून उठते
घातलं कुंपण मोडू नका
कुणी झाडावरती चढू नका
झाड फळांच्या भारानी वाकलं
डाव्या बाजूला जरासं झुकलं
झुकल्या फांदीला ओढू नका
कुणी झाडावरती चढू नका
भारी पिरतीनं पानाआड जपलं
रस चाखाया लई जन टपलं
इश्काच्या माऱ्यानं पाडू नका
कुणी झाडावरती चढू नका
No comments:
Post a Comment