वाट दवांनं भिजून गेली
उन्हं दारात सोन्याची झाली
मायभवानी पावनी आली
पावनेर ग मायेला करू
ओटी आईची मोत्यानं भरू !
माय अंबिका माय भवानी
रूपदेखणी गुणाची खाणी
शंभूराजाची लाडकी राणी
माझी पायरी लागे उतरू
ओटी आईची मोत्यानं भरू !
सुखी नांदते संसारी बाई
न्हाई मागणं आणिक काई
काळी पोत ही जन्माची देई
तूच सांभाळ आई लेकरू
ओटी आईची मोत्यानं भरू !
No comments:
Post a Comment