पावसात नाहती लता,Pavasat Nahati Lata Lata

पावसात नाहती लता लता कळ्या फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले

शांत शांत आसमंत, शीत वात धावतो
अंग अंग चिंब हो चुकार थेंब चावतो
घे कुशीत आसरा जवळ येई प्रेमले

हाच योग ना सखे तू मनात ठेवला
आयता घरातही मिठीत चंद्र गावला
कोटरात पक्षीही असेच आज झोपले

पाहिजे तसे घडे लाज तरीही वाटते
सौख्य सहज लाभता भीती आत दाटते
गारठ्यातही उगा तो कपोल तापले

No comments:

Post a Comment