पाचोळे आम्ही हो पाचोळे,Pachole Aamhi Ho Pachole

पाचोळे आम्ही हो पाचोळे
काय कुणासी देऊ, कुणाचे घेऊ ?
वणवण भटके वनांतले
पाचोळे आम्ही वादळातले

कधी भरारी अथांग गगनी
न कळे केव्हा येतो अवनी
मोहपाश ना आम्हा कुणाचा
स्वैर अम्ही आपुले

तरलो त्या प्रक्षुब्ध सागरी
आणि उतरलो दरी-कपारी
वसुंधरेचे स्वरूप आम्ही
तेहि दुरुन देखिले

इतुके अमुचे असुनी काही
वैर कुणाशी कसले नाही
कसेही असो आम्ही मानतो
जीवन अमुचे भले


कुठे आमुची असते वसती
आस्थेने ना कोणी पुसती
अंध खलाशापरी आमुचे
जीवन नौकेतले

No comments:

Post a Comment