निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥
नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥
यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥
आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥
धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥
देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥
या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥
This comment has been removed by the author.
ReplyDeleteबाळ साहेबांच्या पर्थिवाला अग्नि देताना पद्मजा फेनानी जोगलेकर यांनी हे गीत गायलं !!
ReplyDeleteभरून आलं ..अक्षरशः अवर्णनीय क्षण होता तो ...
परन्तु बाळा सहेबान्ची तुलना महारजान्शी कशी होइल? महाराज तर महाराज होते !!!!
DeleteKhup Sundat....Jay Jay Raghuvira Samartha....:)
ReplyDeleteमहाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥
ReplyDeleteSome verses have been removed... Why?
ReplyDelete