नाच लाडके नाच,Nach Ladake Nach

नाच लाडके नाच
जगापासुनी दूर राहूया नको जनांचा जाच

तुझे नाचणे, माझे गाणे
आपण दोघे धुंद दिवाणे
तुझ्या संगती फुलुनी येती अंगावर रोमांच

तुझी नि माझी अखंड संगत
प्रिती दैवत प्रीतच दौलत
तुझ्या नर्तनी धूळ उडे ती हिरे-माणके-पाचNo comments:

Post a Comment