त्या तुझिया चिंतनात,Tya Tujhiya Chintanat

त्या तुझिया चिंतनात मन माझे गुंतु दे
गीताच्या एकसरी भावफुले गुंफु दे

श्रवणी ये नाम जसे
मूर्ती पुढती विलसे
रूप मनी आठवुनी नित्य तुला पाहु दे

भाव एक नवनवा
गंध धुंद करि जीवा
जीवशीव संगतीत, मन कलिका उमलू दे

छंद तुझा क्षणोक्षणी
बरवा मज दिनरजनी
गीत तुझे आठवूनी तुजसाठी गाउ दे

No comments:

Post a Comment