प्रीतीची आसवे पत्थरात पाझरली
तो सलीम राजपुत्र, नर्तकी अनारकली
अनोळखी शिपाइगड्या एकदाच पाहिले
शूराच्या चरणावर मस्त हुस्न वाहिले
इष्काच्या दरबारी चांदरात बरसली
बंड करुन उठली तलवार सलीमची
राजनिष्ठ राजबीज आस मोंगलांची
अकबरच्या न्यायकसोटीस प्रीत उतरली
ते शराबि नैन कधी कुणा नाहि डरले
राजा वा रयतेला ना कधीच घाबरले
मिलनाच्या वाटेवर भिंत जरी बांधली
अल्लाच्या दरबारी दोन पाखरे जुळी
पंख मिटुन मूकपणे चढली एका सुळी
तो पतंग ती शमा एकसाथ जाळली
No comments:
Post a Comment