का असा गेलास तू ? ना बोलता ना सांगता
दो दिसांच्या संगतीची हीच का रे सांगता ?
भावमाला लोपल्या ओठिंच्या ओठीच का ?
फुलविली तू लाज गाली सुकविण्यासाठीच का ?
पुसुन गेल्या रंग-रेखा चित्र अपुरे रंगता !
दूर व्हाया जवळ आली काय वेडी पाखरे ?
ये पुन्हा ये राजहंसा, पंखि जीवा झाक रे !
हाक मारू मी कशी रे, गूज फुटते बोलता !
ठाऊका ना ठाव कोठे, मार्ग नाही माहिती
शोध घ्याया अंतरीचे नेत्र माझे धावती
गे उदारा, राजसा रे, आसरा दे मागता !
No comments:
Post a Comment