दिवस असे की कोणी माझा,Diwas Ase Ki Koni Majha

दिवस असे की कोणी माझा नाही
अन्‌ मी कोणाचा नाही .....

आकाशाच्या छत्रीखाली भिजतो
आयुष्यावर हसणे थुंकून देतो
या हसण्याचे कारण उमगत नाही
या हसणे म्हणवत नाही ! .....


प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे
त्यावर नाचे मनीचे अबलख घोडे
या घोड्याला लगाम शोधत आहे;
परि मजला गवसत नाही .....

मी तुसडा की मी भगवा बैरागी ?
मद्यपि वा मी गांजेवाला जोगी ?
अस्तित्वाला हजार नावे देतो;
परि नाव ठेववत नाही .....

डोळ्यांमधुनी भिरभिर बघतो सगळे
निरर्थकाचे खेळ चालले नकळे !
बघता बघता पाणी दाटून येते;
त्या अश्रू म्हणवत नाही .....

मम म्हणताना आता हसतो थोडे
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे
या जगण्याला स्वप्नांचाही आता
मेघ पालवत नाही .....

No comments:

Post a Comment