धुंद आज डोळे हवा धुंद झाली
गाली तुझ्या ग कशी लाज आली ?
जसा सोनचाफा तुझी गौर कांती
नको सावरू ग तुझे केस हाती
डौल पारव्याचा तुझ्या मस्त चाली
बंडखोर वारा तुला शीळ घाली !
नको दूर जाऊ सखी थांब थोडी
किनाऱ्यास भेटे अशी लाट वेडी
तुझी पापणी का झुके आज खाली ?
घडी मीलनाची तुषारांत न्हाली !
तुझ्या यौवनाचा फुलावा पिसारा
फुटावा कळीला दवाचा शहारा
हवे ते मिळाले अशा रम्य काली
नवी रूपराणी नवा साज ल्याली
No comments:
Post a Comment