देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे
सप्तसागराला शक्ती, बिंदु बिंदु मिळता पाणी
एकजीवी अणुरेणूची, युगे युगे फिरते धरणी
प्रेमभाव स्वप्नी वचनी पाचामुखी ईश्वर बोले
भूकबळी पक्षी धरता, पारध्याने टाकुन जाळे
पंख गुंतवून पंखी, एकरूप पक्षी झाले
गळ्यामधे घालुनी गळे, मृत्युलाच मारून गेले
वाढवीत भेदभावा, दुष्टतेचा फिरतो कावा
गाठुनिया भोळ्या जिवा, अंधारात घालित घावा
चित्त नित्य सावध ठेवा, एकलक्षी लावुनी डोळे
No comments:
Post a Comment