देवा तुझी आठवण होते,Deva Tujhi Aathavan Hote

देवा तुझी आठवण होते
सुख मावळते आणि शिरावर संकट कोसळते

सुंदर सुमने मुकती प्राणा उरात घुसती काटे
आग धगधगे वरती-खाली वाळवंट रखरखते

दुबळ्या जीवा कळे न जेंव्हा काय खरे अन्‌ खोटे
पिचते अंतर अन्‌ रक्ताचे पाणी-पाणी होते
केवळ ढळढळ अश्रू ढाळणे हेच नशिबी येते



No comments:

Post a Comment