देवा, दया तुझी की ही शुद्ध दैवलीला
लागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला !
भाळावरी बसे या निष्ठूर ही कुठार
घावांतुनी उडावे कैसे सुधा तुषार
निर्जीव जन्म माझा त्या अमृतात न्हाला
माझ्या मुलास लाभे सुख छत्र रे पित्याचे
ही प्रीतिची कमाई की भाग्य नेणत्याचे
उध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला
सौख्यात नांदताना का दुःख आठवावे ?
जे नामशेष झाले ते काय साठवावे ?
हास्यात आजच्या या कळ कालची कशाला ?
No comments:
Post a Comment