देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला
कृष्णा गोदा स्नान घालु दे, रखुमाबाई तीट लावु दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवु दे तुजला
शिवरायाच्या मागिन शौर्या, कर्णाच्या घेइन औदार्या
ध्रुव, चिलयाच्या अभंग प्रेमा, लाभु दे चिमण्या राजाला
No comments:
Post a Comment