दाटतो हृदयी उमाळा,Datato Hridayi Umala

दाटतो हृदयी उमाळा खोल फुटतो हुंदका
प्राण कंठी येति तरिही ओठ माझे बंद का?

मिटुन ओठ कुठवर मी मूक अता राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

तू माझे रक्त आणि तूच प्राण माझा
प्राणांहुन प्रिय मजला तूच बाळ माझा
नाकारित माझे मज कोठवरी राहू?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

या जगात वाऱ्यावर सोडिले तुला मी
स्नेहशून्य जीवन हा वारसा दिला मी
रात्रंदिन सलत व्यथा, सांग, कशी साहू ?
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

कोसळु दे नभ माथा, कोसळो धरा ही
तुजपासून दूर अता राहणार नाही
तुटलेला पाश पुन्हा जोडुनिया घेऊ
का उघड्या डोळ्यांनी सर्वनाश पाहू?

No comments:

Post a Comment