दादला नको ग बाई,Dadala Nako Ga Bai

बया बया बया !
काय झालं बया ?

दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई !
( अग पर असं का ? )

मोडकंच घर, तुटकंच छप्पर
( मग असं ना ! )

अवं मोडकंच घर अन्‌ तुटकंच छप्पर
( मग ऱ्हा की त्यात ! )

अवं पन ऱ्हायाला घरंच नाही
मला दादला नको ग बाई !


फाटकंच लुगडं तुटकीच चोळी
( अग ती तरी कुठं मिळती ? )

अवं फाटकंच लुगडं अन्‌ तुटकीच चोळी

( मग शिऊन घे की )

पण शिवायला दोरा न्हाई
मला दादला नको ग बाई !

कळण्याची भाकर, अंबाड्याची भाजी
( अग ती तर लई ग्वाड वाटती )

अवं कळण्याची भाकर अन्‌ नुसतीच अंबाड्याची भाजी
( मग काय झालं त्यात )

वर तेलाची धारच न्हाई
मला दादला नको ग बाई !

एका जनार्दनी समरस झाले
( अग झालीस न समरस )

पण तो रस येथे न्हाई
मला दादला नको ग बाई !

नगं, नगं, नगं !
का ग बाई, का ग बाई, का ग बाई ?



No comments:

Post a Comment