तुम्ही माझे बाजीराव,Tumhi Majhe Bajirav

माझ्यासाठी दिली राहुटी, इतरांना मज्जाव
तुम्ही माझे बाजीराव

मी मस्तानी, हिंदुस्तानी, बुंदेली पेहेराव

झिरझिरवाणी, निळी ओढणी, वाळ्याचा शिडकाव

तुम्ही मराठे, नव्हे छाकटे, अगदी सरळ स्वभाव
शूर शिपाई, तुमची द्वाही, चारी मुलखी नाव

उभी अंगलट, तांबुस फिक्कट, नयनी दाटला भाव
बोलावाचुन, ख्यातीवाचुन, अर्जी आविर्भाव

काल दुपारी, भरदरबारी, उरी लागला घाव
मीपण चळले, तुम्हा भाळले, आता नाही निभाव


दिठीदिठीचा, नजरमिठीचा, हो‍उ द्या टकराव
या पायासी, मज दासिसी, मिळेल का कधी वाव

No comments:

Post a Comment