तुझे डोळे पाण्याने भरले,Tujhe Dole Panyane Bharale

तुझे डोळे पाण्याने भरले
माझे डोळे पाण्याने भरले
डोळे पाण्याने भरले

काळजातल्या रेशीमगाठी

तोडित असता दोघे मिळुनी
गळ्यास मारुनि आपुल्या मिठी
प्रित विचारी कळवळूनी
'कसे कुणाचे सांगा चुकले'

अबोल आम्ही दोघे बघुनी
प्रीत म्हणाली, 'जात्ये सोडुनी'
कढ दुःखाचे उरी दाबुनी
हात जोडिता थरथरुनी
तिला वंदण्या कर हे जुळले

मने भंगली एक होऊनी
धावु लागली तिच्या मागुनी
नकोस जाऊ म्हणता थबकुनी
गहिवरुनी ती म्हणे चुंबुनी
'झाले गेले, विसरा सगळे'

No comments:

Post a Comment