तुझा सहवास,Tujha Sahavas

तुझा सहवास ! प्रिया !
निळा अवकाश,
गती पवनास, फुला विकास,
उरी उल्हास, प्रिया !
नवीन दिशा, नवीच उषा
नवा मधुमास !
तुझा सहवास !

बुजरी अजाण प्रीती
नवखी मनात भीती
अधरी अबोध गीती
नवखीच आस, नवे नि:श्वास !
तुझा सहवास !

तुझियासवेच, नाथा
जगे हे सुरम्य आता

सुमनी सुगंध आले
जग चांदण्यात न्हाले
तमही प्रकाश झाले
सुखवी जिवा नवा अभिलाष !
तुझा सहवास !

No comments:

Post a Comment