तिन्हीसांज होते, तुझी याद येते
नयनी बाहुल्यांची जोडी आसवांत न्हाते
ऊन-सावल्यांची होते उराउरी भेट
भिरी पाखरांची येती कोटरात थेट
घराकडे घुंगुरांची परततात गीते
सुगंधास ओढुन घेती पाकळ्यां कुशीत
जुळे पिंगळ्याचे बोले काहीसे खुशीत
डोंगरात जातो वारा डोलवीत शेते
अशा वेळी माझ्या राजा हवी तुझी साथ
मान तुझ्या छतीवरती तुझा कटी हात
मुक्यानेच माझी प्रीत तुला बोलविते
No comments:
Post a Comment