जिवाचं मैतर तुम्ही,Jivache Maitar Tumhi

जिवाचं मैतर तुम्ही माझ्या
चल चल सर्जा, चल राजा रे
जिवाचं मैतर तुम्ही माझ्या

बाग मळ्यांची दाटी रे
पिकती माणिकमोती रे
लवलव करिते हिरवळ रे
फुलली नाजूक मखमल रे
जिवाचं मैतर तुम्ही माझ्या

दौलत ही न्यारी
फुलवित शेतकरी
त्यास उणे सारे
दुनियेचे वैभव रे
चल चल सर्जा, चल राजा रे
जिवाचं मैतर तुम्ही माझ्या

मंगल घर अपुलं
गोकूळ गजबजलं
प्रीत इथे झुळझुळते
सूख-ममतेचं माहेर रे

जिवाचं मैतर तुम्ही माझ्या
चल चल सर्जा चल राजा रे
जिवाचं मैतर तुम्ही माझ्या