जेथें जातों तेथें तूं माझा,Jethe Jato Tethe Tu Majha

जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती ।
चालविसी हातीं धरुनियां ॥१॥

चालों वाटे आम्हीं तुझा चि आधार ।
चालविसी भार सवें माझा ॥२॥

बोलों जातां बरळ करिसी तें नीट ।
नेली लाज धीट केलों देवा ॥३॥

अवघें जन मज जाले लोकपाळ ।
सोईरे सकळ प्राणसखे ॥४॥

तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें ।
जालें तुझें सुख अंतर्बाहीं ॥५॥

5 comments: