जय देवी मंगळागौरी,Jay Devi Mangalagauri

जय देवी मंगळागौरी
सुवासीन मी तुला पुजिते

कुंकुम तिलक माझ्या ललाटी
मंगल मणी हे शोभत कंठी
रत्‍न पाचूचा चुडा मनगटी
स्त्रीजन्माचे अहीव लेणे
तुझ्या कृपेने मला लाभते

शीवशंकराहुनी प्रेमळ भोळा
दिधलासी पती तू भाग्यवतीला
देहाच्या देव्हारी पूजीन त्याला
हृदयाची आरती प्राणांच्या ज्योती
अमृत तेजाळ प्रीत जळते

No comments:

Post a Comment