भर उन्हात बसली धरुन सावली गुरं
न्हाई चिंता त्यांची तिन्हीसांज पातुरं
चला दोघं मिळुनी चढू टेकडीवर
चढता चढता धरा हात की वाट नसे रुंद
जाळीमंदी पिकली करवंद
तुम्ही बालपासून जीवांचं लई मैतर
ही तरुणपणातील बाळपणाची लहर
कुणी बघत नाही तो चला गडे लवकर
आंबट गोडी चाखू वाटते पुरवा की छंद
जाळीमंदी पिकली करवंद
मज लाज वाटते सांगायाची धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
अहो, पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी
दऱ्या टेकड्या चला धुंडुया होऊनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंद
No comments:
Post a Comment