जागे व्हा मुनिराज,Jage Vha Muniraj
जागे व्हा मुनिराज, वनी या
जप तप हे सारे वाया
सोडा ही प्रियकरा, साधना
स्वीकारा ही प्रियाराधना
सोडुनि द्या तरुची छाया
आले मी प्रियसखी मेनका
इंद्राघरची परी नर्तिका
वलयांकित माझी काया
पदयुगुलाच्या झंकाराची
सप्तरंगि या सात सुरांची
पसरिन मी भवती माया
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment